अनुभव नवखा.. कुर्ग सहलीचा, अनोखा !
सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत असेल तर कर्नाटकातील कुर्ग, ऊटी आणि मैसूर या ठिकाणी सहल करणे फायद्याचे ठरते. कारण येथे फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत, जी बघण्यासाठी आठवडाभराची सुट्टीही कमी वाटेल. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येथला निसर्ग तुम्हाला वेगवेगळा अनुभव देतो. भारतात कॉफीच्या सर्वात जास्त उत्पादनासाठी कुर्ग प्रसिद्ध आहे. चहाच्या बागा, चहुबाजूंनी पसलेलं नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवीगार जंगले कुर्गला स्वर्गासमान बनवतात असं म्हणण्यास हरकत नाही. शिवाय जोडीला मैसूर व ऊटी ही निसर्गाने समृद्ध ठिकाणे तुमच्या या सहलीला आणखीन रोमांचक बनवतात.
कुर्गमधील भागमंडला, तालकावेरी, निसारगधमा, दुबरे, अबे वॉटर फॉल, इरुपू वॉटर फॉल आणि नागरहोल नॅशनल पार्क ही महत्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. ट्रेकिंगची हौस असणाऱ्यांसाठी पुष्पागिरी आणि ब्रह्मगिरीचा पर्याय सुद्धा आहे. आराम आणि ॲडव्हेंचर असा दुहेरी आनंद घेण्यासाठी पर्यटक कुर्गला भेट देत असतात. त्यामुळेच कुर्गची ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ कनार्टक अशी ओळख आहे. माऊंटेन क्लायम्बिंगपासून ते जंगल ट्रेकिंग, राफ्टिंगपासून ते फ्लाइंग, एलिफंट कॅम्पपासून ते फिशिंगपर्यंत सर्वच गोष्टी येथे उपलब्ध आहेत. मे महिना हा कुर्गला भेट देण्यासाठी अतिशय योग्य आहे. म्हणून या महिन्यात येथे पर्यटकांची विशेष गर्दी आढळते.
या ठिकाणांच्या प्रसिद्धीमुळेच श्री. तुषार माळी यांनी आपल्या कुटुंबासह श्रीयोगच्या कुर्ग, ऊटी आणि मैसूर सहलीचा मनमुराद आनंद लुटला. त्यांच्या सहलीतील त्यांनी पाठवलेले भ्रमंतीचे क्षण खास आपल्यासाठी आम्ही शेअर करत आहोत.
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :