निसर्गसौंदर्याचा एक अद्भूत आविष्कार… अर्थातच केरळ !
भारताच्या हिरव्या निसर्गसमृद्धीचे भरभरून वरदान लाभलेले एक सुंदर ठिकाण म्हणजे केरळ ! दक्षिण भारताची ठसठशीत ओळख असणाऱ्या या केरळमधील नद्या, ओढे, कालवे, तलाव, धबधबे अशा जलसमृद्धीने परिपूर्ण ठिकाणी पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळतो. याच जलस्त्रोतांचा तेथील पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोठा वाटा आहे. शिवाय पब्लिक ट्रान्सपोर्टचे देखील हे प्रमुख माध्यम आहे. अहो इतकंच काय, तर पर्यटकांना राहण्यासाठी सुद्धा नदीमध्येच होडीच्या रुम्स उपलब्ध करुन दिल्या जातात, म्हणजे मोठमोठी हॉटेल्स बांधायचा प्रश्नच येत नाही. मेन्टेनन्स सुद्धा कमी असल्याने सहलीसाठी अतिशय स्वस्त आणि परवडणारं असं हे ठिकाण. दृष्टी जाईल तिथपर्यंत पाण्याने वेढलेल्या होडीच्या खोलीत राहण्याची मजा अनुभवण्यासाठी केरळला आवर्जून भेट द्यायलाच हवी!
केरळच्या प्रसिद्धीमुळेच पुण्याचे श्री. संदीप राठी यांनी आपल्या कुटुंबासह श्रीयोगच्या केरळ सहलीचा मनमुराद आनंद लुटला. त्यांच्या सहलीतील त्यांनी पाठवलेले भ्रमंतीचे क्षण खास आपल्यासाठी आम्ही शेअर करत आहोत.
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :