खूप खूप धन्यवाद... श्रीयोग!
आर.सी. फर्टिलायझरच्या वतीने आम्ही आमच्या काही सहकाऱ्यांसाठी गोवा ट्रिपची योजना आखली आणि त्यासाठी श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सची
निवड केली. सांगतांना विशेष आनंद होतोय की श्रीयोग टूर्स ने आमचा विश्वास सार्थ ठरवला आणि आमची गोवा ट्रिप अविस्मरणीय बनवली.
आम्ही तिथे सोबत नेलेल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या राहण्यासाठी सर्वोत्तम हॉटेल आणि सर्वोत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय
गोवा मधील प्रसिद्ध विविध चर्चेस, समुद्र किनारे, ऐतिहासिक वारसा असणारी ठिकाणे हे सर्व पाहण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची सुविधाही
श्रीयोग टूर्सचे श्री. मिलिंद पाटील यांनी अतिशय उत्तम पद्धतीने करुन दिली होती. गोव्याचा हा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पाहण्याची आमची
मनिषा श्रीयोगमुळेच पूर्ण होऊ शकली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्व सहकाऱ्यांसाठी आयोजित केलेली ही अविस्मरणीय सहल
श्रीयोग मुळे अगदी आरामदायक पद्धतीने पार पडली यात अजिबात दुमत नाही.
धन्यवाद श्रीयोग! धन्यवाद मिलिंदजी...
श्री. मनोहर पाटिल आणि ग्रुप,
आर. सी. फर्टिलायझर, धुळे.