स्वप्नाहूनही सुंदर...
आमची सहल खूप अप्रतिम आणि आनंददायक बनवल्याबद्दल प्रथम श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स आणि श्री. मिलिंद पाटील यांचे मनापासून आभार!
बर्फाळलेल्या पर्वतरांगांना पाहण्याची मनात इच्छा घेऊन आम्ही श्री. मिलिंद पाटील यांच्या श्रीयोग टूर्सद्वारे हिमाचल प्रदेशच्या शिमला-मनाली
सहलीला आलो. केवळ चित्रपटातून पाहिलेला हा रम्य परिसर प्रत्यक्ष पाहतांना फारच वेगळा अनुभव मिळत होता. उंचच उंच बर्फाच्छादीत डोंगर,
खोल दऱ्या, नागमोडी वळणाच्या घाटातील रस्ते, कापसासारख्या बर्फातलं स्किईंग आणि अशा अनेक अनुभवातून आमची सहल बहरत होती.
श्रीयोग टूर्सद्वारे करण्यात आलेली राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था यामुळे तर सहलीतला निम्मा तणाव केव्हाच गायब झाला होता.
निसर्गरम्य ठिकाणं पाहण्यास जाण्यासाठी नेमलेले ड्रायव्हर्स आणि वाहने सुद्धा सर्वोत्तमच होती. विशेष म्हणजे ती विश्वासातली होती.
श्री. मिलिंद पाटील यांनी अगदी भावाप्रमाणे आमच्या सहलीतील सर्व अडचणी चुटकीसरशी दूर करुन आम्हाला सुरक्षित सहलीचा
विश्वास प्रदान केला.
खरोखर, हिमाचल प्रदेश पहावा तर तो श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स सोबतच....
श्री. नितेश महाले,
धुळे