मन प्रफुल्लित करणारा हिमाचल..

मी आणि माझी पत्नी काही दिवसांपूर्वीच श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स सोबत हिमाचल प्रदेशची शिमला-मनाली-चंदिगढ

ही सहल करुन परतलो. खरोखर निसर्गाची समृद्धी काय असते? याचा प्रत्यक्ष प्रत्यय अनुभवायचा असेल तर सर्वांनी

हिमाचल प्रदेशला जायलाच पाहिजे. चहुकडे पसरलेल्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, वळणा-वळणातून मार्ग काढत जाणारे

डोंगर-दऱ्यातील चित्तथरारक रस्ते, सूचिपर्णी वृक्षांची घनदाट जंगले आणि इतर बऱ्याच नेत्रसुखद निसर्गातील गोष्टी 

तुमचं मन मोहून टाकतील.

आम्ही तर बर्फात खूप एन्जॉय केला! साईट सिईंग करण्यासाठी आम्हाला मिळालेले वाहनचालक तर फारच अनुभवी आणि

मितभाषी होते. श्रीयोग टूर्सने याची विशेष काळजी घेतली होती. प्रत्‍येक स्‍थळ आम्ही भारावलेल्या नजरेतून मनात साठवत होतो.

शिवाय राहण्यासाठी केवळ उत्कृष्ट रेटींग असलेल्या हॉटेल्सचीच निवड करण्यात आली होती. आमच्या आवडीनुसार खाण्याचे

विविध पदार्थही उपलब्‍ध होते. खरंच श्रीयोग टूर्समुळे सहलीची दगदग कधीच जाणवली नाही. श्री. मिलिंद पाटील यांनी

हे सगळं अतिशय उत्तम रित्या मॅनेज केलं याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आमच्या आठवणींना रोमहर्षक व

अविस्मरणीय बनवल्याबद्दल श्रीयोग टूर्सचे मनापासून आभार!

भविष्यातील सर्व सहलींसाठी आम्ही आता केवळ श्रीयोगचीच निवड करणार!


श्री. गणराज कदम

अभियंता, मुंबई