हिमाचल प्रदेश... एकदम बेस्ट!

आम्ही सर्व 15 ते 23 जणांचा समूह, ज्यात कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचा सहभाग होता, आम्ही सगळेच श्रीयोग टूर्स च्या

शिमला-मनाली-चंदिगढ ट्रिपला गेलो. खरोखर या सहलीचा आनंद हा शब्दात मांडता येणार नाही...

सर्वदूर निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली बर्फाची उधळण डोळ्यांचे पारणे फेडते. 5 रात्र आणि 6 दिवस असे या सहलीचे 

वेळापत्रक होते. परंतू हे 6 दिवस इतक्या लवकर संपले याचीच खंत वाटते. कारण ही सहल कधी संपूच नये असंच प्रत्येकाला

वाटत होतं. कुफरी, सोलंग व्हॅली, रोहतांग पास आणि अशाच अनेक पर्यटन स्थळांना भेट देतांना आम्ही हरपून जात होतो.

श्रीयोग टूर्सने आमच्या सगळ्यांसाठीच राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. समूहातील स्त्री सदस्यांच्या दृष्टीने करण्यात आलेली

ही व्यवस्था खरोखर कौतूकास्पद होती. श्रीयोग टूर्सने आमची विशेष काळजी घेत सहलीचे नियोजन उत्तम केले होते. त्याबद्दल

श्रीयोगचे श्री. मिलिंद पाटील यांचे विशेष आभार! 

5 रात्र आणि 6 दिवसाच्या या सहलीचे योग्य नियोजन केल्याबद्दल आमच्याकडून त्यांना फुल मार्क्स!

Good Job Shreeyog!


श्री. शशिकांत क्षिरसागर

उद्योजक

नाशिक