खरोखर धरणीवर स्वर्ग अवतरल्याचा अनुभव..
सहकुटुंब एकदा तरी जम्मू-काश्मिर पाहण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीयाचे असते तसे ते आमचेही होते. कारण नुकतेच आम्ही आमचे
हे दिव्य स्वप्न श्रीयोग टूर्सच्या माध्यमातून पूर्ण केले. श्रीयोग टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे श्री. मिलिंद पाटील हे आमचे तसे परिचितच...
त्यांच्याकडे मी जम्मू-काश्मिर सहलीची मनिषा बोलून दाखवली, बजेट विचारले. त्यावर त्यांनी, "तुम्ही बिनदिक्कत सहलीला जा,
मी सगळी व्यवस्था करतो." असा हक्काने विश्वास दिला आणि आम्ही सहल कधी पूर्ण करुन परतलो हे कळलेच नाही.
सहलीत आम्ही सगळेच कुटुंबीय असल्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्ति असणे स्वाभाविक होते. वयोवृद्धांना कोणतीही अडचण होऊ
नये, स्त्री सदस्यांची सुरक्षा या बाबी लक्षात घेऊनच श्री. मिलिंद पाटील यांनी सर्व हॉटेल्स / रिसॉर्टस् बुक केले होते. जेवणही अगदी
घरच्यासारखंच होतं... चविष्ट आणि रुचकर! काश्मिरमधील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी नेमण्यात आलेले वाहनचालकही
अतिशय प्रामाणिक व मितभाषी होते. त्यामुळे ते अनोळखी वाटलेच नाहीत. कुठलीच दगदग किंवा थकवा आम्हाला संपूर्ण सहलीत
कधीच जाणवला नाही. याचं पूर्ण श्रेय हे श्री. मिलिंद पाटील यांनाच आहे.
भविष्यातही कौटुंबिक सहलीसाठी आम्ही श्रीयोगचीच निवड करु, अगदी शंभर टक्के!
श्री. सुबोध शर्मा