केरळ सहल... शब्दात वर्णन करता येणार नाही असा अप्रतिम अनुभव!

आम्ही डिसेंबर 2017 मध्ये श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्ससह केरळच्या रोमांचक सहलीचा अनुभव घेतला. श्रीयोग टूर्सचे श्री. मिलिंद पाटील

यांचे सर्वसमावेशक असे नियोजन, अंमलबजावणी आणि समन्वय यामुळे सहल आणखीनच सुखावह झाली. राहण्यासाठी बुक केलेले

सुखसोयींनी सुसज्जीत हॉटेल्स तर केवळ लाजवाब! आम्हाला कुठे जायचे असल्यास आम्ही फक्त श्री. मिलिंद पाटील यांना कळवावे आणि 

त्यांनी क्षणार्धात त्याची सर्व चोख व्यवस्था करावी.... सहलीत सोबतीला कुटुंबातील स्त्रिया असल्यावर सुरक्षेची काळजी वाटणं स्वाभाविक 

असतं, पण ती काळजीसुद्धा श्री. पाटील यांनी लिलया दूर केली. त्यामुळे सहलीचा आम्ही खऱ्या अर्थाने आनंद उपभोगू शकलो. जेवणाची 

व्यवस्थाही अत्यंत स्वादिष्ट आणि उत्तम होती. सहलीतील आमच्या प्रत्येक गोष्टीची इतकी सुरेख व्यवस्था केल्याबद्दल श्री. पाटील यांचे

विशेष आभार... त्‍यांनी सुरुवातीपासून आम्हाला सर्व मार्गदर्शन तर केलेच शिवाय ते प्रवासादरम्यानही कायम संपर्कातच होते. त्यामुळेच की

काय आम्हाला कुठेच भाषेचीही अडचण जाणवली नाही.

खरंच! श्रीयोग टूर्स मुळे आमची केरळ सहल आनंदमय झाली, यात तिळमात्र शंका नाही!


श्री. संजय अहिरराव