मालदिव... A Perfect Honeymoon Destination!
लग्नानंतर हनिमूनसाठी एखाद्या स्वप्नवत ठिकाणी जाण्याची हौस प्रत्येक कपल ला असते, तशीच ती आम्हालाही होती. शिवाय
मला मालदिव बाबत आधीपासूनच विशेष आकर्षण असल्यामुळे मी माझ्या हनिमूनसाठी मालदिवचीच निवड केली. तिथला स्वच्छ,
सुंदर आणि अथांग समुद्र, सर्वदूर पसरलेले निरभ्र आकाश आणि अशा स्वच्छ समुद्रात असलेले वॉटर बंगलो / व्हीला या सर्वांबद्दल
मी खूप काही ऐकलेलं आणि पाहिलेलंही होतं. मी सर्व माहितीच त्याबद्दल गोळा केली होती. आता प्रश्न होता तो केवळ तिथे आपल्या
जोडीदारासोबत प्रत्यक्ष जाण्याचा... बरं, नेटवर खूप सर्च करुनही कोणत्या टूर कंपनीवर विश्वास ठेवून पॅकेज बुक करावं हा गोंधळ
वाढत चालला होता. पण अशातच श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स बद्दल विश्वासू माणसाकडून माहिती मिळाली आणि मी तत्काळ
त्यांच्याशी संपर्क साधला.
संभाषण झाल्याप्रमाणे श्री. मिलिंद पाटील यांनी मला मालदिव पॅकेजची सर्व माहिती देवून तिथल्या सोयी-सुविधांबद्दल सांगितले.
त्यांच्याशी बोलल्यावर एक वेगळाच विश्वास निर्माण झाला आणि विशेष म्हणजे मालदिवला जाण्याचा प्लॅन सोपा वाटू लागला. त्यांनी
अगदी मित्राप्रमाणेच आमची सगळी सोयही केली. मालदिवला 3 ते 4 दिवस आम्ही मनसोक्त एन्जॉय केले ते केवळ श्रीयोग टूर्स
आणि श्री. मिलिंद पाटील सरांमुळेच... सर्व कसं अगदी ठरल्याप्रमाणे पार पडलं. सर्वोत्तम रेसॉर्ट, उत्तम जेवण, प्रेक्षणीय स्थळांना भेट
देण्यासाठीही वाहनाची उत्तम व्यवस्था आणि इतरही बऱ्याच सुविधा श्री. मिलिंद पाटील यांनी चोखपणे मॅनेज केल्या होत्या.
मी पाहिलेलं मालदिव हनिमून ट्रिप चं स्वप्नं अगदी व्यवस्थित पूर्ण झालं.
याबद्दल श्रीयोग टूर्स आणि श्री. मिलिंद पाटील यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत...
Thank you Sir!
श्री. प्रसाद गायकवाड
संगणक अभियंता, पुणे