कुटुंबासोबत आम्ही पाहिलेलं नेपाळ
दि. 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह नेपाळ सहलीला गेलो. श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या श्री. मिलिंद पाटील यांच्याशी
माझा जुना परिचय असल्याने सहलीसाठी माझा त्यांच्यावरच पूर्ण विश्वास होता. अगदी माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच त्यांनी आमच्या नेपाळ
सहलीचे उत्तम नियोजन करून दिले. माझ्यासोबत सहलीसाठी ज्येष्ठ नागरिक जास्त असल्याने श्री. पाटील यांनी त्यानुसारच राहण्यासाठी सर्व
हॉटेल्सची व्यवस्था केली होती. सात्विक आणि रुचकर जेवण हा तर या सहलीचा विशेष कौतुकाचा भाग होता. ज्येष्ठांच्या तब्येतीला मानवणारं साजूक
जेवण आम्हाला मिळेल याची विशेष खबरदारी श्री. पाटील यांनी घेतली होती. शिवाय पर्यटन स्थळी जाण्यासाठी दिलेले वाहन आणि वाहन चालक
दोघेही उत्तम होते. प्रवासाची दगदग अजिबात जाणवली नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी अचानक वैद्यकिय गरज भासू शकते याचा अंदाज घेऊन
श्री. पाटील यांनी वैद्यकिय सोयी-सुविधांसाठीही दूरदर्शी आणि समयसुचक नियोजन करुन ठेवले होते. पण सुदैवाने त्याची गरज भासली नाही.
आम्हा खैरनार कुटुंबियांची विशेष काळजी घेऊन इतकी सुरेख नेपाळ सहल आयोजित केल्याबद्दल आणि केलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल
श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सला अनेक अनेक धन्यवाद!
पुन्हा आपल्यासोबत सहलीला जाणे नक्कीच आवडेल यात तिळमात्र शंका नाही!
श्री. त्र्यंबक खैरनार व कुटुंबिय,
कळवण