अप्रतिम कर्नाटक सहल 

(ऊटी, म्हैसूर आणि कोडाईकनाल) 

एक व्यावसायिक या नात्याने माझी आणि श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे मालक श्री. मिलिंद पाटील यांचा तसा फार आधीपासूनच परिचय होता. माझ्या कंपनीच्या

कर्मचाऱ्यांसाठी एक सहल आयोजित करण्याचा विचार मी त्यांना बोलून दाखवला आणि त्यांनी मला त्वरित कर्नाटक सहलीची कल्पना सुचविली. त्यांच्याशी

जूना परिचय असल्याकारणाने विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी लागलीच होकार दिला आणि श्री. मिलिंद पाटील हे पुढील नियोजनाला लागले. 

आमचा सर्व मिळून एकूण 22 जणांचा समूह कर्नाटकला ठरल्याप्रमाणे पोहोचला. इतक्या जणांचा राहण्याचा, जेवणाचा, तेथे प्रेक्षणीय स्थळी फिरण्याचा

चोख बंदोबस्त श्री. मिलिंद पाटील यांनी आगोदरच केलेला असल्याने आम्हाला चिंता करण्याचे काही कारणच नव्हते. 5 रात्र आणि 6 दिवस आम्ही 

मनसोक्त कर्नाटक दर्शनाचा आनंद घेतला. खरोखर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले एक लक्षणीय हिल स्‍टेशन असणारे कर्नाटक मनात घर करुन 

बसले. शिवाय ऊटी, म्‍हैसूर आणि कोडाईकनाल ही ठिकाणे तर स्वर्गाचा अनुभव देणारीच म्हटली पाहिजेत. 

आमच्यातील महिला सदस्यांच्या दृष्टीने सहल कशी सुरक्षित आणि सुनियोजित होईल याची काळजी श्री. पाटील यांनी विशेषरित्या घेतली होती.

श्रीयोग टूर्स सोबत कर्नाटक सहलीचा आनंद आम्ही शब्दात वर्णन करु शकणार नाही एवढा अफाट आहे.

पुनःश्च धन्यवाद श्रीयोग!


श्री. मधुकर माळी

ओएसिस इझ्रो-टेक ॲग्रो इंडस्‍ट्रिज्‌

धुळे