शिमला-मनाली जावे तर श्रीयोग सोबतच...

श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स सोबत आम्ही नुकतेच शिमला-मनाली च्या सहलीला जाऊन आलो. खरोखर भारताच्या उत्तरेकडे

असणाऱ्या हिमाचल प्रदेशमधील शिमला आणि मनाली या दोन hillstations ला जिवनात एकदा तरी भेट द्यावी...

आणि सहलीचा सर्वोत्तम आनंद घ्यावयाचा असेल तर त्यासाठी श्रीयोग टूर्स कडूनच सहल बुक करावी. कारण टेन्शन फ्री

सहलीचा आनंद काय असतो हा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला. श्रीयोग टूर्स कडून श्री. मिलिंद पाटील यांनीच आमचे तिकिट

बुक करण्यापासून ते सहलीतले आमच्यासाठीचे सर्व नियोजन पाहिले. मी आणि माझे कुटुंब आम्ही मनसोक्त बर्फाळलेल्या

निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. पंचतारांकित आणि सर्वोत्तम नामांकन असलेल्या रेसॉर्ट मध्ये आमची राहण्याची व्यवस्था 

करण्यात आल्याने, गैरसोयीचा कोणताच प्रश्न नव्हता. रेसॉर्टचा स्टाफही प्रामाणिक होता. अनोळखी लोकातही आपलेपणाची

जाणीव व्हावी अगदी तसंच वातावरण होतं. जितकं रेसॉर्ट, सर्व्हिस उत्तम तितकंच तिथलं जेवणही सर्वोत्तम...

एवढ्या दूर गेल्यानंतर एकही प्रेक्षणीय स्थळ बघायचे राहू नये याचा पुरेपूर आढावा घेऊन नेमून दिलेले वाहन आणि चालक

खरोखर कौतूकास पात्र आहेत. ड्रायव्हरला त्या ठिकाणाची सर्व माहिती होती. त्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणाची 

सर्व माहिती मिळू शकली. बर्फात घालवलेले क्षण तर कधीही न विसरता येणारेच होते. 

केवळ स्वप्न भासावे असे हे सहलीचे 4 ते 6 दिवस श्रीयोग टूर्स मुळे प्रत्यक्षात साकार झाले. त्याबद्दल मनापासून धन्यवाद!

आता दरवर्षी सुट्ट्यांमध्ये श्रीयोग सोबत एक तरी सहल करुया असा आम्ही निश्चयच केला आहे..



श्री. ईश्वर पाटील