आम्हाला आठवणींचा अमूल्य ठेवा दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

लग्नानंतर हनिमूनसाठी योग्य पर्यटन स्थळाचा पर्याय निवडतांना आम्ही अनेकांचे सल्ले घेतले. ज्यात आम्हाला ऊटी आणि कूर्ग

हा सहलीचा पर्याय आकर्षक वाटला. सहलीचे योग्य नियोजन करणाऱ्या योग्य टूर कंपनीचा शोध सुरु असतांनाच मी श्रीयोग

टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या वेबसाईटला भेट दिली. तिथे मला मनासारखं ऊटी आणि कूर्ग सहलीचं पॅकेज अगदी परवडणाऱ्या 

किंमतीत मिळालं. म्हणून मी जास्त विचार न करता कंपनीशी संपर्क केला आणि खरंच मला त्याचा आज जास्त आनंद होतो आहे.

श्रीयोग टूर्स तर्फे श्री. मिलिंद पाटील यांनी आम्हाला सहलीविषयी योग्य मार्गदर्शन केले, आमच्या सर्व शंकांचे निरसन केले. सर्वात 

महत्वाचे म्हणजे एखाद्या अनोळखी ठिकाणी सहलीला जाण्याची आमच्या मनातली भीती त्यांनी आधी घालवली. 

ऊटी सह अन्य सर्व ठिकाणी जेथे आम्ही मुक्कामी थांबणार होतो तेथे त्यांनी आमच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. 

रुम्स प्रशस्त आणि नीटनेटके होते. हॉटेल सर्व्हिसही चोख होती. जेवणापासून इतर सर्व सोयी-सुविधा अप्रतिम होत्या. सहलीला

गेल्यावर तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांची भटकंती करणे हाच सर्वांचा उद्देश असतो, तसाच तो आमचाही होता. जो श्रीयोग टूर्सने दिलेल्या

आरामदायक वाहनसेवेमुळे लिलया पूर्ण झाला. दूरवरच्या प्रेक्षणीय स्थळी जातांनाही आम्हाला प्रवासाची कोणतीही दगदग

जाणवलीच नाही. ड्रायव्हर्सही अगदी प्रामाणिक आणि कौशल्यप्रविण होते. 4 ते 5 दिवसाची ही सहल आमच्यासाठी आयुष्यभराची

एक अप्रतिम आठवण ठरणार होती. जी श्रीयोग च्या सर्वोत्कृष्ट नियोजनामुळे आमच्यासाठी आठवणींचा अमूल्य ठेवा देणारी ठरली.

त्यासाठी श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स आणि श्री. मिलिंद पाटील यांचे मनःपूर्वक आभार!


श्री. अभिजीत चौधरी