श्रीयोग मुळे जुळून आला शिमला-मनाली पाहण्याचा योग
मी माझ्या कुटुंबासह श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या शिमला-मनाली सहलीला गेलो होतो.
खरंच हा आम्हा सर्वांसाठीच एक विलक्षण सुंदर अनुभव होता. शिमला-मनालीला जातांना सर्वात आधी
आम्ही अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतले. भक्तिपूर्ण वातावरणात न्हाऊन निघालेल्या सुवर्ण मंदिराच्या
परिसरात मन अधिकच प्रफुल्लित झाले. दर्शन झाल्यावर थोडा फेर फटका मारुन आम्ही शिमला-मनाली
या निसर्गसुंदर पर्यटन स्थळांकडे मार्गस्थ झालो.
उंचच उंच बर्फाच्छादित पर्वतरांगा प्रत्यक्षात पाहतांना डोळे आश्चर्याने विस्फारले होते. माझी मुलं तर त्यामुळे
अधिकच खूष झाली होती. डोंगर दऱ्यातून रस्त्यावरचा तो प्रवास खरंच अप्रतिम होता. संपूर्ण कुटुंबासह
सर्व प्रसिद्ध स्थळांची पाहणी करुन आम्ही जेव्हा आमच्यासाठी बुक केलेल्या रेसॉर्टला यायचो तेव्हाही उत्साह
संपलेला नसायचा. कारण रेसॉर्टसुद्धा अगदी Luxurious होतं. सहलीचा दिवसभराचा थकवा दूर करणारं
रेसॉर्टचं वातावरण चैतन्यमय होतं. जेवण अगदी खमंग, रुचकर आणि चविष्ट... आम्हाला प्रत्येक ठिकाणी
घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरशी तर वेगळाच ऋणानुबंध जुळला होता. इतका त्याचा स्वभाव प्रामाणिक आणि
खेळकर होता. श्रीयोग टूर्सचे श्री. मिलिंद पाटील यांना आमच्या सहलीच्या यशाचं खरं श्रेय आहे. ज्याप्रकारे
त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्यासाठी सर्वोत्तम नियोजन केले ते खरंच कौतुकास्पद आहे.
श्रीयोग टूर्सची शिमला-मनाली ट्रीप म्हणजे सहलीचा मनमुराद आनंद देणारी सफर आहे.
धन्यवाद श्रीयोग!
श्री. अनिल