सहल नवी... आनंद नवा! पण सहलीतला सोबती मात्र तोच..

आम्ही सर्व कुटुंबीय आणि मित्रपरिवार असा 15 ते 23 जणांचा समूह श्रीयोग टूर्स सोबत पुन्हा एकदा 

सिक्कीम आणि दार्जिलिंगच्या सहलीला जाऊन आलो. मागच्याप्रमाणेच या सहलीचाही आनंद आणि अनुभव विलक्षण होता.

4 रात्र आणि 5 दिवस असे या सहलीचे वेळापत्रक होते. या 5 दिवसात आम्ही भारताच्या या निसर्गरम्य ठिकाणी अगदी आरामात

मनसोक्त वेळ घालवला. आधीच्या अनुभवाप्रमाणेच यावेळीही श्रीयोग टूर्सने आमच्या सगळ्यांसाठीच राहण्यापासून 

ते सर्व ठिकाणी फिरण्यासाठीची उत्तम व्यवस्था केली होती. श्रीयोग टूर्सने आमची विशेष काळजी घेत सहलीचे नियोजन 

उत्तम केले होते. त्याबद्दल श्रीयोगचे श्री. मिलिंद पाटील यांचे पुनःश्च धन्यवाद!

त्यांच्या सर्वोत्तम नियोजनामुळेच आमच्यासारखे यात्री कोणत्याही त्रासाशिवाय सहलीचा खऱ्या अर्थाने आनंद उपभोगू शकतात.

त्यासाठी श्रीयोगचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत...


श्री. शशिकांत क्षिरसागर

उद्योजक

नाशिक