दक्षिण भारताचा नयनरम्य परिसर

श्रीयोग टूर्स आणि ट्रॅव्हल्स सोबत मी माझ्या कुटुंबाला घेऊन दक्षिण भारतातील प्रसिद्ध ऊटी आणि कूर्ग या दोन पर्यटन स्थळांना

भेट दिली. खरोखर या दोन ठिकाणी सहलीचा अनुभव फार छान आला. हिरवाईने नटलेल्या परिसरासोबतच, मोठे तलाव, नद्या

या विविध निसर्गप्रकारांनी समृद्ध असं हे दक्षिण भारतातील सर्वच पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार

नाही. आम्ही श्रीयोग टूर्स कडून बुकिंग केलेले असल्याने आम्हाला राहण्याचा आणि जेवणाचा इतर खर्च करावा लागलाच नाही. 

कारण या दोन्ही गोष्टींची श्रीयोग टूर्सच्या वतीने श्री. मिलिंद पाटील यांनी आगोदरच चोख व्यवस्था केलेली होती.

राहण्यासाठी ऊटी आणि कूर्ग मधील सर्वोत्तम पंचतारांकित हॉटेल्सची निवड त्यांनी केली होती. त्यामुळे सहलीचा मनमुराद आनंद

अधिक द्विगुणित झाला. त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेले उत्तम जेवणाचाही आम्हाला यथेच्‍छ आस्वाद 

घेता आला. तेथील फेमस टूरिस्ट स्पॉट बघण्यासाठी आम्हाला गाडी आणि ड्रायव्हरही श्रीयोग टूर्सनेच नेमून दिला असल्याने 

त्यासाठीही कुठलीच मेहनत घ्यावी लागली नाही. सर्वच ठिकाणी फिरून आम्ही पुन्हा हॉटेल वर परतायचो तेव्हा प्रवासाचा 

कुठलाच ताण-तणावही आम्हाला जाणवायचा नाही. 

खरोखर श्रीयोग टूर्सने आम्हाला ऊटी आणि कूर्ग सहलीचा एक सर्वोत्कृष्ट अनुभव दिला आहे. 

त्यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत....


श्री. गोरख पाटील