अंदमान पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाले...

हनिमूनसाठी अंदमान ची निवड करतांना थोडं टेन्शनच आलं होतं. बजेट काय असेल? सगळं नीट मॅनेज होईल की नाही? 

राहणं, फिरणं, जेवण याची नीट व्यवस्‍था कशी होईल? आणि अशा बऱ्याच शंका एकामागून एक येतच होत्या.... 

पण श्रीयोग टूर्सच्या मॅनेजमेंट मुळे यातली एकही शंका संपूर्ण अंदमान सहलीमध्ये एकदाही पुन्हा डोक्यात डोकावलीच नाही. 

Really very very Thankful to Mr. Milind Patil Sir. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आमची ही हनिमून टूर मजेत झाली. 

त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. 

आपण राहण्यासाठी निवडलेले हॉटेल म्हणजे जणू स्वर्गसुखाचा अनुभव देणारे होते. राहण्याची सोय तर कम्माल, धमाल आणि बेमिसाल! 

शिवाय रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची साथ म्हणजे दुधात साखरंच.. फिरण्यासाठी केलेली वाहनांची निवड असो किंवा तिथपर्यंत 

सुखरुप घेऊन जाणारा ड्रायव्हर, सगळ कसं आपलंसं वाटलं. त्यामुळे प्रवास आरामदायक झाला. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की 

श्री. मिलिंद पाटील यांनी अगदी हवं तेव्‍हा केलेलं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य. आम्ही सांगावं आणि पुढच्याच क्षणी त्यांनी ते मॅनेज करावं.. 

सहलीच्या चौकशीपासून ते विमान तिकिट बुकींग आणि अंदमानची टूर व ती पूर्ण करुन येईपर्यंत एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे, किंबहुना 

त्याहीपेक्षा जास्त मोलाचं सहकार्य त्यांनी आम्हाला केलं. अंदमानला जाण्याची आमची ही पहिलीच वेळ होती, जी श्रीयोग टूर्स मुळे खूपच amazing झाली. 

या संस्मरणीय अनुभवाबद्दल श्रीयोग टूर्स आणि श्री. मिलिंद पाटील यांचे मनापासून आभार! 

आता ज्याल्या कोणाला टूर प्लान करायचा असेल मी श्रीयोगचेच नाव त्यांना नक्की सुचवेल...


श्री. मनीष गहीवाल,

संगणक अभियंता

धुळे