सहल अध्यात्मिक अनुभवाची...
संपूर्ण भारत देशात आता कोरोनामुळे लागलेले निर्बंध प्रशासन हळूहळू शिथिल करत आहे. त्यामुळे अर्थातच देशांतर्गत पर्यटनाला लागलेला ब्रेक आता सैल होऊ लागला आहे. म्हणून कित्येक हौशी पर्यटक भारत भ्रमण करत आहेत तर अनेकजण पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सज्जही आहेत. रोजची धावपळ आणि कामाच्या दगदगीतून क्षणभर विसावा मिळावा म्हणून सहलीला कुठे गेले पाहिजे अशी विचारणा ज्यावेळी आम्हाला केली जाते तेव्हा आम्ही त्यांना आवर्जून वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, काशी, लखनऊ या अध्यात्मिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या ठिकाणांची नावे सुचवत असतो.
या ठिकाणी सहलीला जाणे म्हणजे मनःशांतीसोबतच प्रत्येकाला हव्या असलेल्या एका सात्विक आनंदाची प्रचिती अनुभवण्यासारखे आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमूना असलेली प्राचिन मंदिरे, अथांग असा गंगा नदीचा तीर आणि घाट, रामाची जन्मभूमी, काशी विश्वनाथाचे अद्भूत दर्शन आणि गंगा आरती यासारख्या विलक्षण अध्यात्मिक वातावरणाने पावन झालेल्या भूमिला प्रत्यक्ष भेट देणे म्हणजे जन्माचेच सार्थक आहे.
आमचे धुळ्याचे पर्यटक श्री. पुरुषोत्तम कोतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच वाराणसीसोबत या सर्वच ठिकाणांच्या सहलीचा आनंद अनुभवला. त्यांनी आमच्यासोबत शेअर केलेले काही खास क्षण आपण पाहू शकतात...
सहलीच्या उत्कृष्ट नियोजन आणि उत्तम अनुभवासाठी सुजाण पर्यटक नेहमीच आमची निवड करतात. त्यांची ही निवड सर्वार्थाने योग्य ठरवणे हाच आमचा प्रामाणिक हेतू असतो. तरीही आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.