निसर्ग सौंदर्याचा खजिना… उत्तराखंड!
2022 वर्ष सुरु झाले आणि हळूहळू पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला. त्या अनुषंगाने दोन वर्ष कोरोना नियमांनी हैराण झालेले आणि घरी राहून कंटाळलेले आमचे हौशी पर्यटकसुद्धा सहलीसाठी आतुर होऊ लागले. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आम्ही उत्तराखंड लेडीज स्पेशल ट्रीपचे आयोजन केले आणि त्याला उत्तम प्रतिसादही लाभला. उत्तराखंडचे नैसर्गिक सौंदर्य अद्वितीय आहे म्हणूनच, येथे जगातल्या विविध भागातून पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे सहलीसाठी येत असतात. याशिवाय या स्थळाचा सांस्कृतिक वारसाही अधिक समृद्ध आहे. उत्तराखंडमधील नैनिताल, अलमोडा, कौसानी, कॉर्बेट पार्क, बिनसर आणि पिठोरागड हे भाग कुमाऊ म्हणून प्रसिद्ध आहेत जे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. हिमालयाचे विलोभनीय दर्शन पर्यटकांना या भागातून घेता येते शिवाय येथे जगातल्या मोठ्या अभयारण्यांपैकी एक असलेल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचीही सफर अनुभवता येते.
धुळ्याच्या सौ. रचना रेलन यांनी त्यांच्या मैत्रिणींसह फेब्रुवारी महिन्यातल्या आमच्या उत्तराखंड सहलीचा मनमुराद आनंद अनुभवला. तेथील काही अविस्मरणीय आणि खास क्षण….
सहलीच्या उत्कृष्ट नियोजन आणि उत्तम अनुभवासाठी सुजाण पर्यटक नेहमीच आमची निवड करतात. त्यांची ही निवड सर्वार्थाने योग्य ठरवणे हाच आमचा प्रामाणिक हेतू असतो. तरीही आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.