ज्यांना सहलीचा हेवा.. त्यांनी जरुर बघावं गोवा!

    भारतातच नव्हे तर जगात विशेष ख्याती असलेलं "गोवा" हे ठिकाण पर्यटकांच्या अगदी हृदयाजवळचं पर्यटन स्थळ आहे. विविध स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे, वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैलीचे अनेक भव्य चर्च, आकर्षक निसर्गसौंदर्य आणि खऱ्या अर्थाने सहलीचं एन्जॉयमेंट देणाऱ्या गोव्याला प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव प्रत्येकानेच घ्यायला हवा. म्हणून तर कित्येक पर्यटक धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विश्रांतीसाठी गोव्याची वाट धरतात.

    पर्यटकांच्या संपूर्ण आराम आणि विशेष सोयी-सुविधांसाठी आम्ही तितकीच स्वच्छ आणि टापटीप हॉटेल्स / रिसॉर्टस्‌ निवडतो. त्यामुळेच आमचे लाडके पर्यटक आमच्या टूर पॅकेजची किंमत बघून नाही तर आमची प्रामाणिक सेवा बघून आमच्यासोबत निर्धास्त मनाने सहलींचा आनंद घेतात.

    धुळ्याचे श्री. संजय अहिरराव यांनीही त्यांच्या गुड मॉर्निंग ग्रुपसोबत आमची गोवा सहल जल्लोषात एन्जॉय केली. त्यांच्या सहलीचे काही दिलखुलास क्षण...

    सहलीच्या उत्कृष्ट नियोजन आणि उत्तम अनुभवासाठी सुजाण पर्यटक नेहमीच आमची निवड करतात. त्यांची ही निवड सर्वार्थाने योग्य ठरवणे हाच आमचा प्रामाणिक हेतू असतो. तरीही आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.

      .