निवृत्तीनंतर एकदा तरी पहावी अशी दुबई!
संपूर्ण जगातील अबालवृद्धांना ज्याच्या प्रगतीने आणि अद्भूत स्थापत्यशास्त्राने आश्चर्यचकीत केले आहे ते शहर म्हणजे पर्यटकांचे लाडके दुबई. दुबई मनसोक्त फिरण्यासाठी मोजक्या दिवसांची सहलसुद्धा अपुर्ण आहे. दुबईचे वैविध्यपूर्ण आयकॉनिक टॉवर्स , प्रशस्त रस्ते , सुंदर उद्याने, थिम पार्क, जागतिक आश्चर्य ठरलेली बुर्ज खलिफा ही उत्तुंग इमारत हे सगळं थक्क करणारं विश्व आयुष्यात एकदा तरी याची देही, याची डोळा पहावं असं कुणाला बरं वाटणार नाही ? म्हणूनच दरवर्षी आश्चर्याने परिपूर्ण असलेली दुबई पाहण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक येथे आपला तळ ठोकून असतात.
अशाच आतुर पर्यटकांपैकी असणाऱ्या धुळ्याच्या ज्येष्ठ नागरिकांनी नुकताच खास ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या दुबई सहलीचा आनंद अनुभवला. निवृत्तीनंतर आपल्या जोडीदारासह निवांत फिरण्यासाठी त्यांनी या सहलीची आणि विशेष करुन आमची निवड केली. याबद्दल त्यांचे अनेक आभार ! त्यांच्या सहलीचे काही दुर्मिळ आणि सुंदर क्षण आपल्यासाठी…
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.